मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याची घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यानंतर पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आता या ठिकाणी हे डबे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे.

कर्जत ते लोणावळा दरम्यान असलेल्या छोट्या स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल पुणे पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर कोयान एक्स्प्रेसही मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. भुसावळ पुणे एक्स्प्रेसची यात्रा नाशिक रोड स्थानकात संपवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लांब पल्ल्याच्या मुंबईहून पुणेमार्गे जाणाऱ्या ट्रेन्स या इगतपुरी मार्गे वळवण्यात आल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे. मालगाडीचे ५ ते ६ डबे घसरल्याचीही माहिती समोर आली आहे.