मुंबई: अठराव्या मजल्यावरून लघुशंका करत असताना तोल जाऊन पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी वडाळा येथे ही घटना घडली.

वडाळ्याच्या जय शिवाजी नगर मध्ये मातोश्री सदन ही १८ मजल्याची इमारत आहे. रविवारी सकाळी ९ च्या सुमराास या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून पडून प्रकाश शिंदे (५५) या इसमाचा मृत्यू झाला आहे. या इमारतीत ते एका नातेवाईकाकडे गेले होते.

याबाबत माहिती देताना आरएके मार्ग पोलिसांनी सांगितले की, शिंदे १८ व्या मजल्यावरील लिफ्टजवळील कोपर्यात लघुशंका करत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते वरून खाली तळमजल्यावरील खडड्यात पडले. अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी त्यांची पत्नी आणि अन्य लोकांचे जबाब नोंदवले आहे. यात संशयास्पद असे काहीच आढळले नाही. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे.