A replica of a flamingo made from garbage in Mumbai kandalwan envoirnment mumbai | Loksatta

मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती

‘एन्व्हार्नमेंट लाईफ’ आणि अन्य पर्यावरणप्रेमी संस्थांनी आठवड्यातून एका दिवस कांदळवन, खाडी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे.

मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती
मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती

मुंबई : पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरणविषयक संस्थांनी कांदळवन, खाडीची स्वच्छता आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याला कांदळवन, खाडीतील कचरा गोळा करण्यात येत आहे. कांदळवन-खाडीतून मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेल्या कचऱ्यापासून फ्लेमिंगोची मोठी प्रतिकृती साकारून पर्यावरणप्रेमींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. कचऱ्यातून जमा करण्यात आलेले प्लास्टिक, थर्माकोल आदींचा वापर करून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मोहिमेतून पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘एन्व्हार्नमेंट लाईफ’ आणि अन्य पर्यावरणप्रेमी संस्थांनी आठवड्यातून एका दिवस कांदळवन, खाडी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत कांदळवन, खाडीतून दर आठवड्यातून एका दिवसात साधारण साधारण १०० किलोहून अधिक कचरा बाहेर काढण्यात येत आहे. या कचऱ्यात पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक घटक असल्याचे निदर्शनास आले आहे. या कचऱ्यात प्लास्टिक, थर्माकोल, काच, रबर आदींचा समावेश आहे. थर्माकोलचे डबे, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, अन्य वस्तू, काचेच्या बाटल्या आणि विविध वस्तू, रबरी चप्पल आणि पट्टे, चिनी मातीच्या मूर्ती कचऱ्यात सापडत आहेत. मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या या कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला होता. अखेर या कचऱ्यापासून फ्लेमिंगोची मोठी प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : आरे कारशेडप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कचऱ्यातील रबरी चप्पल, थर्माकोल, प्लास्टिकच्या वाटल्यांचा वापर करून प्लोमिंगोची ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. देशातील जैविविधतेचे संवर्धन आणि फ्लेमिंगोच्या अधिवासाचे जतन व्हावे या उद्देशाने फ्लेमिंगो प्रतिकृती तयार करण्यात आली आहे, असे ‘एन्व्हार्नमेंट लाईफ’चे संस्थापक धर्मेश बरई यांनी सांगितले. कांदळवन, खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून नागरिकांनी पर्यावरणाविषयी सजग व्हायला व्हावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
२००८ सालचे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार ?

संबंधित बातम्या

मुंबई महापालिकेचा काटकसरीचा संकल्प
Maharashtra Karnataka Dispute : कर्नाटकला धडा शिकवा!; राज ठाकरे यांचे सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन
नोटबंदीनंतर जितेंद्र आव्हाडांनी उपसले श्वेतपत्रिकेचे हत्यार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द