मुंबई : ‘मोक्का’ प्रकरणात फरार असलेल्या दोन कुख्यात आरोपींना गुन्हे शाखा ११ च्या पथकाने अटक केली आहे. अब्दुल रहमान खान उर्फ शेरा (२९) आणि नफीज अहमद खान (३३) अशी या आरोपींची नावे आहेत.
गोरेगावमध्ये १६ फेब्रुवारी २०२२ रोजी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना अब्दुल रहमान खान उर्फ शेराला (२९) रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी त्याचा साथीदार नफीज अहमद खान (३३) मात्र फरार झाला होता. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी नफीसलाही अटक केली. दोन्ही आरोपी जामीन मिळवून बाहेर आले होते. मात्र त्यानंतर ते फरार झाले होते. दरम्यान, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांनी संघटितपणे केलेले गंभीर गुन्हे लक्षात घेऊन त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांनी न्यायालाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार दोघांविरोधात महाराष्ट्र संघटीतत गुन्हेगारी कायद्याच्या अधिनिमयाअंतर्गत (मोक्का) गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांचा शोध सुरू होता. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या पथकाने या दोन्ही फरार आरोपींना अटक केली आहे.