मुंबई: राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार मुंबई मध्यवर्ती कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह या चार कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे आणि तपासणी यंत्रे  (बॉडी स्कॅनर) बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> सातारा:आमदार मकरंद पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट; साताऱ्याच्या राजकिय वर्तूळात एकच खळबळ

ही यंत्रे खरेदी करण्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.  राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत २०१७ मध्ये जनहित याचिकेवर  निकाल देताना उच्च न्यायालयाने राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश राज्यशासनास दिले होते. त्यानुसार २०१७ पासून शासनाने राज्यातील कारागृहांची सुरक्षा व्यवस्था आधुनिक करण्यावर भर दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चार मध्यवर्ती कारागृहांत बसवण्यात येणारी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया राबविण्यास राज्याच्या तुरुंग उपविभागाच्या प्रकल्प अंमबजावणी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी १४ कोटी ४४ लाख ७१ हजार २७६ आणि बॉडी स्कॅनरसाठी  ९ कोटी १२ लाख अशा एकूण २३ कोटी ५६ लाख ७१ हजार २७६ रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच खरेदीची प्रक्रिया सुरू होईल.