९५व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे तारू शिवसेनेने दिलेल्या ‘हवे’मुळे बेळगावच्याच धक्क्याला लागले आहे. मराठी नाटय़ संमेलन बेळगावातच होणार आहे. संमेलनासाठी शिवसेना लागेल ती मदत करायला तयार आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर आणि कोषाध्यक्ष लता नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी विविध अडचणींबद्दल चर्चा केली. ‘सीमाप्रश्न आणि नाटय़ संमेलन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत,’ अशा आशयाचे विधान नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केल्यानंतर संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2014 रोजी प्रकाशित
शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर नाटय़संमेलन बेळगावात
९५व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे तारू शिवसेनेने दिलेल्या ‘हवे’मुळे बेळगावच्याच धक्क्याला लागले आहे.
First published on: 23-12-2014 at 12:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After support of shiv sena natya sammelan held at belgaum