काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात एक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आज ( २३ मार्च ) अधिवेशनात उमटले. विधिमंडळ परिसरात शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपाच्या आमदारांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं आहे. पण, यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यांनी सत्ताधारी आमदारांना खडसावत याचा तीव्र निषेध केला आहे.

अजित पवार म्हणाले, “जोडे मारण्याचा प्रकार झाला, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. परंतु, विधिमंडळ कार्यक्षेत्रात, असा प्रकार घडता कामा नये. यासाठी विधानसभा अध्यक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.”

हेही वाचा : “तुमच्यात हिंमत असेल तर…” आशिष शेलारांचं भर विधानसभेत बाळासाहेब थोरातांना आव्हान

“अधिवेशन व्यवस्थित चालावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत अधिवेशन व्यवस्थित सुरू होते. मात्र, काँग्रेस नेत्यांबद्दल अशाप्रकारची गोष्ट सत्ताधारी आमदारांकडून घडली आहे. उद्या विरोधी पक्षाकडून देखील घडेल. प्रत्येक पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात. तुमच्या पक्षांचा नेत्यांचा अभिमान आहे, तसा आम्हालाही आमच्या नेत्यांचा अभिमान आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “…तर मोदींसह भाजपाच्या काही नेत्यांना जन्मठेप होईल”; राहुल गांधींना झालेल्या शिक्षेवरून सचिन सावंतांचं टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अशी जोडे मारण्याची पध्दत विधिमंडळ आवारात सुरू झाली. तसे दुसर्‍या कुणाच्या तरी फोटोला जोडे मारले, तर कुणालाच आवडणार नाही. आम्हालाही ते पटणार नाही,” असेही अजित पवार यांनी सरकारला सुनावले.