केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) सहकुटुंब मुंबईतील ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते. शाहांच्या लालबाग दर्शनावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अमित शाह दरवर्षी गणोशोत्सवात लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात.

लालगाबचा राजाचं दर्शन घेताना अमित शाहांसोबत त्याची पत्नी, सून आणि नातवंडही असल्याचं पाहायला मिळालं. शाहांनी लालबागचा राजासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. त्यानंतर पुष्पहारही अर्पण केला. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हेही उपस्थित होते.

लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रा येथील गणपतीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर शाह मलबार हिलला गेले. तेथे देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ या निवासस्थानी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. याच ठिकाणी मुंबई कोअर कमिटीची एक बैठकही झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “भाजपाचं मुंबई प्रेम म्हणजे….” अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

फडणवीसांच्या सागर निवासस्थानानंतर ते वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी जातील. या ठिकाणी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४५ मिनिटे बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे अनेकांचं लक्ष आहे. या बैठकीनंतर अमित शाह पवईला जातील. तेथे ए. एम. नाईक संस्थेच्या शाळेचं उद्घाटन करतील.