मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्यात येत असून यासाठी विद्यापीठाने नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणीसाठी आवश्यक असलेले पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे. डिसेंबर २०२१ आणि तत्पूर्वी पदवी प्रदान करण्यात आलेल्या पदवीधरांची मतदारयादीसाठी नाव नोंदणी करण्यात येत आहे. पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेकांना नाव नोंदणी करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा >>> बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा, पुनर्विकासाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदवी प्रमाणपत्र गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी पदवीधरांना अंतिम सत्राची गुणपत्रिका व पदवी गहाळ झाल्याबाबतचा पोलिसांचा दाखला आणि विहीत शुल्क भरल्याची पावती लेखी अर्जासोबत विद्यापीठाला सादर करावी लागणार आहे.पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज भवन, मुंबई विद्यापीठ येथे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना २४ जानेवारीपर्यंत पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.