तुरुंग अधिकाऱ्यांनी ५.३५ वाजेपर्यंत वाट पाहिली, पण…; आर्यन खानची आजही सुटका नाहीच!

उद्या सकाळी येणार तुरुंगामधून बाहेर

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत असताना, या प्रकरणातील केंद्रबिंदू ठरलेल्या शाहरुख पुत्र आर्यन खानची आज देखील आर्थर रोड तुरुंगामधून सुटका झाली नाही. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला तुरुंगामध्ये घालवावी लागणार आहे. उद्या सकाळी आर्यन तुरुंगातून बाहेर येणार आहे. तुरुंग अधीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Aryan Khan Bail Case: आर्यन खानला १ लाख रुपयांच्या बाँडसह ‘या’ १४ अटींवर जामीन, उच्च न्यायालयाचा निर्णय

साडेपाच वाजेपर्यंत आर्यनच्या जामीनाचं पत्र आर्थर रोड जेलच्या टपाल पेटीत पडणं आवश्यक होतं. परंतु, या टपाल पेटीत त्या वेळेत पत्र न आल्याने, आता आर्यनची सुटका ही उद्या होणार आहे.

आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने सर्वांना नियम समान असून कुणासाठीही वेळेत बदल होणार नाही, असे म्हटले आहे. सुटकेसाठी आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत रिलीझ ऑर्डरची प्रत प्रत्यक्ष निर्धारित वेळेत पडणे आवश्यक असते. त्यासाठी तुरुंग अधिकारी साडेपाच वाजेपर्यंत वाट पाहतात, अशी माहिती देखील आर्थर रोड तुरुंग अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली आहे.

उच्च न्यायालयाकडून काल आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज र्मचट व मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता.

Mumbai Drugs Case : आर्यन खानला आजची रात्रही तुरुंगातच घालवावी लागणार का?

आर्यनखानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं.

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी केला युक्तिवाद –

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानसाठी युक्तिवाद करताना म्हटलं की, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”

आर्यन खानला जामीन ; उच्च न्यायालयाचा निर्णय

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आर्यनच्या जामिनाला केलेला विरोध खोडून काढणारा युक्तिवाद आर्यनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आर्यन आणि अन्य दोन याचिकाकर्त्यांच्या याचिका मंजूर केल्या. जामीन मंजूर का करण्यात आला, याचा तपशीलवार आदेश शुक्रवारी सायंकाळपर्यंत देणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर रोख रकमेवर आर्यनची सुटका करण्याची विनंती रोहतगी यांनी केली. त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळली आणि हमीदारांच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचे नमूद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan will not be released from the jail today msr

ताज्या बातम्या