करोनामुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील मालमत्ता कराचा दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा – राहुल गांधींवर कारवाई होणार का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“ठाकरे सरकारने बिल्डर,दारुवाले,बारवाले, हाँटेल मालकांवर सवलतींची खैरात केली होती. तर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ होणार नाही याची काळजी घेतली. मुंबईकर हो, फरक बघा. ते गळे काढणार..मुंबई आमची..मुंबई आमची तिजोरी भरणार बिल्डर, कंत्राटदार आणि बारवाल्यांची!” असं शेलार ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

मागील दोन-अडीच वर्षांच्या करोनाकाळाचा मोठा फटका सर्वच घटकांना बसला होता. टाळेबंदी तसेच करोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैंनंदिन रोजगार बंद होता.

हेही वाचा – “राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आघाडीत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

यामुळे सर्वसाधारण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याने मालमत्ता कर माफ करण्याची मागणी मुंबईकर, विविध संस्था, लोकप्रतिनिधींकडून महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत यावर्षी मालमत्ता कराचे दर सध्या आहेत तेच कायम ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्याबाबतच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हेही वाचा – मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चिखली नाक्यावर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही सवलत दिल्याने महानगरपालिकेचे अंदाजे १११६ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मालमत्ता करात वाढ केल्यास त्याचा सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला फटका बसला असता. हे टाळण्याकरिताच मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली नाही, असं बोलल्या जात आहे.