शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटवरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. संजय राऊतांनी तीन दिवसांपूर्वी एका मुलीचा फोटो आपल्या ट्विटरवर ट्वीट केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलीचा फोटो ट्वीट केल्याने संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावरून राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय, अशा शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

संजय राऊत काय म्हणाले?

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मी काय चुकलो? या मुलीवर कोयत्याचे वार झाले आहेत, या मुलीची आई माझ्याशी बोलली, तिच्या आईनं आक्रोश करत सरकारकडे ‘जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मला इच्छामरणाची परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे. पारधी समाजातली ही मुलगी आहे. बार्शीतल्या काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर आहेत. जर मी दिल्लीत असताना मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल तर मी ज्या माध्यमातून पोहोचवायला हवा, त्या माध्यमातून पोहोचवला आहे.”

हेही वाचा : “…असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, चित्रा वाघ संतापल्या; नेमकं काय आहे प्रकरण?

“मी त्या मुलीचं नाव, तिच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी काहीही बोललेलो नाही. फक्त ‘माननीय मुख्यमंत्री या मुलीचं सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका’ इतकंच म्हटलं. यावर जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय, हे स्पष्ट दिसेल. आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन केली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण, मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय ते यातून स्पष्ट दिसतंय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं आहे.

हेही वाचा : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार? बच्चू कडू म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…नाहीतर सीबीआयला तक्रार करणार”

यावर आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे. “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून, तसले प्रकार त्यांना माहिती असतील. गेल्या आठवड्याभरात किती ठिकाणी ते गेले, त्याचं नाव सांगावं. नाहीतर सीबीआयला तक्रार करणार,” अशी मिश्कील टिप्पणही शेलार यांनी केली आहे.