पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील सुमारे १०२ एकराचा तीन हजार कोटी रुपयांचा भूखंड शासनाच्या ताब्यातून मूळ जमीनमालकांना व पर्यायाने बिल्डरला देण्याचा निर्णय घेतल्याने तत्कालीन महसूलमंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. हा निर्णय कसा कायदेशीर ठरतो, हे स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत, अशी माहिती भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यासंदर्भात पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी चार वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2014 रोजी प्रकाशित
अशोक चव्हाण अडचणीत ?
पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील सुमारे १०२ एकराचा तीन हजार कोटी रुपयांचा भूखंड शासनाच्या ताब्यातून मूळ जमीनमालकांना व पर्यायाने बिल्डरला देण्याचा निर्णय घेतल्याने तत्कालीन महसूलमंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

First published on: 31-07-2014 at 07:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan in trouble in pune plot case