लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : एप्रिल महिन्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरूवारी रात्री ॲन्टॉप हिल येथे घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Bests app-based airport premium service discontinued
मुंबई : बेस्टची ॲप आधारित विमानतळ प्रीमियम सेवा बंद
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Gajanan Kirtikar Eknath Shinde (1)
“त्यांनी शिंदेंना सलाम ठोकणं मला पटलं नाही”, पत्नीच्या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, “माझ्यावर…”

विजयकुमार देवेंद्र याचा गेल्या महिन्यात मुर्गन देवेंद्र याच्याशी वाद झाला होता. तो राग डोक्यात ठेवून गुरूवारी रात्री १०.३० च्या सुमारास मुर्गन आणि वेलू देवेंद्र यांनी मक्कावाडी जंक्शन येथे दुचाकीवरून आलेल्या विजयला अडवले आणि चाकूने विजयच्या पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेला विजय रस्त्यावर कोसळल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

आणखी वाचा-मुंबई : नागपाड्यात नायजेरियन तस्कराला पकडले, ८० लाखाचे कोकेन जप्त

दरम्यान, हा प्रकार कळताच ॲन्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजयला तत्काळ शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून मुर्गन आणि वेलू या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली.