शिवसेनेचे बदलापूर उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कात्रप येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ दिवसभर बदलापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राऊत यांच्या पत्नी विजया आणि भावजय शीतल नगरसेविका आहेत. कात्रप परिसरातील त्यांच्या संपर्क कार्यालयात राऊत बसले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. दरम्यान, या हत्येप्रकरणी रात्री उशीरा आमदार किसन कथोरे यांच्यासह योगेश राऊत, जगदीश राऊत, समीर धारवे, रमेश पाटील, पप्पू मोरे, देवेंद्र मालुसरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
शिवसेनेच्या बदलापूर उपशहरप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
शिवसेनेचे बदलापूर उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कात्रप येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.

First published on: 24-05-2014 at 03:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur deputy shiv sena president shot dead