वांद्रे रेल्वेस्थानकाजवळ लागलेल्या आगीत झोपडय़ा भस्मसात झाल्याने नुकसान झालेल्यांना मुख्यमंत्री निधीतून मदत केली जाणार आहे.
आगीतील नुकसानीचे पंचनामे झाल्यावर अधिकृत झोपडपट्टीवासीयांना ही मदत दिली जाणार आहे.
वांद्रे येथील झोपडय़ांना शनिवारी रात्री आग लागली होती व त्यात अनेक झोपडय़ा पूर्णत: खाक झाल्या, तर काहींचे थोडेफार नुकसान झाले.
सर्वस्व नष्ट झालेल्यांना मदत देण्याची विनंती मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार पूनम महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यांनी ती मान्य केली असून नुकसानीचे पंचनामे झाल्यावर मदतीच्या रकमेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra fire victims to get relief from cm fund
First published on: 27-04-2015 at 02:28 IST