स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. यानतंर महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाधवांच्या ‘मातोश्री’ची ईडी चौकशी करा! भाजपची मागणी

यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची अंमलबजावणी संचालया मार्फत (ईडी) चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चौकशीतून कोणी सुटू शकणार नाही. आता खूप काही घडणार आहे, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत की, “या डायरीत कोणत्या ‘मातोश्री’ची नोंद आहे, हे मला माहीत नाही. पण आता चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले, तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत”.

किरीट सोमय्यांचं ट्वीट –

“हद्द कर दी…यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे….वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख…जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??,” असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत मुंबईत आंदोलन –

हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला असला तरी जाधव हे शिवसेनेचे नेते असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. हा उल्लेख ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाबत आहे की अन्य कोणाविषयी आहे, हा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँडिरग) प्रकार असून त्याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत पुढील आठवडय़ापासून मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाकाळात ३८ मालमत्ता खरेदी करुन ३०० कोटी रुपये यशवंत जाधव यांनी मिळविले आहेत. जनतेचे लुटलेले पैसे मुंबईकर जनतेला परत मिळाले पाहिजेत, असे भातखळकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kirit somaiya shivsena yashwant jadhav it raid maharashtra cm uddhav thackeray matoshree sgy
First published on: 28-03-2022 at 11:15 IST