गुजरातमध्ये न भूतो, न भविष्यती असे घवघवीत यश मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेवढे यश मिळाले नाही, तेवढं आता मोदींच्याच करिष्मामुळे मिळताना दिसत आहे. सध्या भाजपा १५८ जागांसह आघाडीवरती आहे. तर, काँग्रेसला केवळ १६ जागांवरती आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरात निकालावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केला होता. “गुजरातचा निकाल अपेक्षितच आहे. तिकडे आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर नक्कीच अटीतटीची लढाई झाली असती. पण, बहुधा दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा, असं साटंलोटं आप आणि भाजपात झालं असावं, अशी लोकांना शंका आहे,” असं संजय राऊत म्हणाले होते.

हेही वाचा : गुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पंतप्रधान मोदी…”

संजय राऊतांच्या या विधानावर आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हिमाचलचा संपूर्ण निकाल अजून हाती यायचा आहे. गुजरातमध्ये सातव्यांदा बहुमत घेऊन सरकार स्थापन होईल, असं दिसत आहे. हा विक्रम आहे. जेव्हा हा विक्रम होतो. तेव्हा काही लोकांच्या पोटात मुरडा येतोच आणि त्याचा आवाज आपण बघत आहोत,” असा खोटक टोला शेलार यांनी विरोधकांना लावला आहे.

हेही वाचा : गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ड्रग्जची आयात…”

संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना शेलार यांनी म्हटलं, “काही लोक संपादक आहे की पादक हे बघावं लागेल. सार्वजनिक ठिकाणी वायूप्रदुषणाचे काम म्हणजे संजय राऊत यांची पत्रकार परिषद,” असे शेलार यांनी सांगितलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ashish shelar reply sanjay raut over aap and bjp gujarat election and mcd election ssa
First published on: 08-12-2022 at 14:03 IST