मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार – वैतरणा आणि सफाळे – केळवे रोडदरम्यान पीएससी स्लॅब आणि गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. विरार – वैतरणादरम्यान रात्री १.४० ते सकाळी ७.१० वाजेपर्यंत आणि सफाळे – केळवे रोडदरम्यान रात्री १.५० ते सकाळी ६.५० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. परिणामी, पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक ९३००१ विरार-डहाणू रोड लोकल, गाडी क्रमांक ९३००६ डहाणू रोड – चर्चगेट लोकल, गाडी क्रमांक ९३००३ विरार-डहाणू रोड, गाडी क्रमांक ९३००८ डहाणू रोड – चर्चगेट लोकल, गाडी क्रमांक ९३००५ चर्चगेट – डहाणू रोड लोकल, गाडी क्रमांक ९३०१० डहाणू रोड – बोरिवली लोकल, गाडी क्रमांक ६९१४३ विरार – संजन पॅसेंजर, गाडी क्रमांक ६१००१ बोईसर – वसई रोड पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक ६९१४० सुरत-विरार पॅसेंजर पालघरपर्यंत चालवण्यात येईल. ही गाडी पालघर – विरारदरम्यान अंशतः रद्द करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक १९१०१ विरार – भरूच पॅसेंजर पालघर येथून सोडण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजीची गाडी क्रमांक ६९१६४ डहाणू रोड – पनवेल वसई रोडवरून सोडण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी गाडी क्रमांक ६१००२ डोंबिवली-बोईसर पॅसेंजर वसई रोड येथे थांबविण्यात येईल. तसेच काही रेल्वेगाड्यांच्या २५ ते ६० मिनिटे विलंबाने धावतील.