मुंबई महापालिकेनं महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’ कन्टेन्मेंट झोन म्हणून रविवारी जाहीर केला. तसा अधिकृत बॅनरच पालिका कर्मचाऱ्यांनी या बंगल्याबाहेर लावला आहे. त्यामुळे या भागात आता कोणालाही प्रवेश करता येणार नाही. अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हे दोघे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे.” या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

त्याचबरोबर अभिषेक बच्चननेही ट्विट करुन माहिती दिली की, “आज माझी आणि माझ्या वडिलांची म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्हा दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफला विनंती केली आहे की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांनीही करोना चाचणी करावी. सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहनही मी करतो आहे”


अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची आता कोविड चाचणी होणार आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करु यासाठी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc officials put a banner outside jalsa the residence of actor amitabh bachchan to define it as a containment zone aau
First published on: 12-07-2020 at 11:24 IST