लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अंधेरी येथील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यापासून २-३ सागरी मैल अंतरावर समुद्रात मासेमारीसाठी गेलेली मच्छीमारांची बोट बुडून तीन जण बेपत्ता झाले होते. या घटनेत बेपत्ता झालेला उस्मानी भंडारी (२२) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

आणखी वाचा-मुंबई: बेस्टच्या ५५१ बसगाड्या आगारातच उभ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्सोवा येथून शनिवारी रात्री ८ वाजता मासेमारीसाठी तीन जण बोट घेऊन समुद्रात गेले होते. त्यावेळी ही बोट बुडाली आणि बोटीबरोबर गेलेले विजय बामणिया (३५) यांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. मात्र, अन्य दोघे बेपत्ता झाल्यामुळे अग्निशमन दल व इतर यंत्रणांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर बेपत्ता झालेल्या दोघांपैकी विनोद गोयल (४५) यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी जुहू चौपाटीवर आढळला, तर उस्मानी भंडारी याचा मृतदेह मंगळवारी सकाळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर सापडला. उस्मानीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.