मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललीत हॉटेलला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून ही धमकी दिली. या धमकीनंतर हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी फोन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉम्ब निकामी करण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी

हॉटेल ललीतमध्ये सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास फोन करून वरील धमकी देण्यात आली होती. यानंतर हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने हॉटेमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. एवढचं नाही तर हॉटेलच्या महाव्यवस्थापकाच्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आले आहे. हॉटेल प्रशासनाने या धमकीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३८५, ३३६ आणि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत अतिरेकी हल्ला करण्याची धमकी
काही दिवसांपूर्वीच मुंबईत २६/११ सारखा अतिरेकी हल्ला करण्यात येणार असल्याच्या धमकीचा संदेश मुंबई पोलिसांना आला होता. हा संदेश पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून आल्याची माहिती मिळाली. एकूण ६ जण हा हल्ला करणार असल्याचं संदेशात नमूद केलं होतं.