मुंबई – मुंबईत असलेल्या खुल्या जागा आंदण देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले धोरण चुकीचे आणि घटना विरोधी असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे. हे धोरण रद्द न केल्यास मुंबई काँग्रेस न्यायालयात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रस्तावित धोरणाला काँग्रेसने विरोध केला आहे. या धोरणाला सामाजिक कार्यकर्त्यांनीही विरोध केला आहे. या धोरणाच्या मसुद्यावर नागरिक व संस्था यांनी ३० दिवसांच्या आत म्हणजे दिनांक १० ऑक्टोबरपर्यंत सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Jijau Vikas Party Announces Candidates for Bhiwandi and Palghar Lok Sabha Seats
जिजाऊ विकास पार्टी भिवंडी व पालघर लोकसभा लढवणार
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

हेह वाचा – मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक, २९ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी

मुंबई काँग्रेसतर्फे शुक्रवारी आझाद मैदान येथील मुंबई विभागीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात याच विषयावर पुढील दिशा ठरवण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी विविध स्वयंसेवी संस्थाना बोलावण्यात आले होते. यात माजी खासदार प्रा. भालचंद्र मुणगेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद, रोहित जोशी, संजीव वल्सन, ब्रायन आदी उपस्थित होते. मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली आणि मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सर्व खुल्या जागा आणि उद्याने पालिकेनेच परिरक्षण करण्यावर भर दिला. वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी मुंबईतील अज्ञात असलेल्या वनांची माहिती देत त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

हेही वाचा – ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकांची म्हाडा घरे महाग! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर सहा लाखांची वाढ

माजी खासदार संजय निरुपम यांनी वांद्रे पश्चिम येथे एक विशाल निर्दशने स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून करण्याची सूचना केली तर प्रा मुणगेकर यांनी अन्य देशांप्रमाणे शासनानेच खुल्या जागांचा सांभाळ करावा, असा मुद्दा मांडला. बैठकीच्या शेवटी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी येत्या सोमवारी पालिका आयुक्तांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर धोरण रद्द नाही केले तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार अशोक जाधव, माजी नगरसेवक अशरफ आजमी, जगदीश अण्णा अमीन, शीतल म्हात्रे, गणेश यादव, झिया उररहमान वाहिदी, प्रणिल नायर, प्रमोद मांद्रेकर उपस्थित होते.