मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ५८ हजार अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज नागपूर, औरंगाबाद आणि लातूर या जिल्ह्यांतून आले आहेत.

बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २८ मे २०२४ रोजी होणार आहे. बी. एस्सी. नर्सिंग हा इयत्ता बारावीनंतर (विज्ञान) ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे.

हेही वाचा…मुंबईत ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात; ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांनाही फटका

गतवर्षापासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएच- बी.एस्सी नर्सिंग सीईटी घेण्याचे निश्चित केले. गतवर्षी बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ३१ हजार ३९७ अर्ज आले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली असून, या वर्षी तब्बल ५८ हजार ६३५ अर्ज आले आहेत.