सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्याबदल्यात वातानुकूलित लोकल चालवण्यात येत असल्याने गैरसोय झालेल्या प्रवाशांनी त्याविरोधात उत्स्फुर्तपणे आंदोलन केले. मात्र रद्द झालेल्या सामान्य लोकलच्या फेऱ्या पुन्हा पुर्ववत होणार नाहीत, अशी ठाम भूमिका मध्य रेल्वेने घेतली आहे.मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील विभागीय व्यवस्थापक कार्यालयात मंगळवारी दुपारी २ वाजता आमदार जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत दोन तास बैठक झाली. या बैठकीनंतर आव्हाड यांनी एका साध्या लोकलमधून सुमारे चार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. एक लोकल रद्द केल्याने या प्रवाशांनी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – मुंबई : महानगरपालिकेच्या जलतरण तलावांसाठी ऑनलाईन सदस्यत्व ; पहिल्या टप्प्यात ६ हजार नागरिकांना दिले जाणार वार्षिक सदस्यत्व

वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येत असून सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ठाण्यातून जाणाऱ्या चार सामान्य लोकलच्या बदल्यात चार वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीमुळे कळवा कारशेडमधून सुटणाऱ्या सामान्य लोकल पकडून काहीजण सीएसएमटीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे सामान्य लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा जनआंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा – पत्रा चाळ गैरव्यवहार : ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांना विचारले असता, काही जण वातानुकूलित लोकल चालवण्याच्या बाजूने नाहीत. मात्र असे असले तरीही वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करुन पुन्हा सामान्य लोकल फेऱ्या चालवता येणार नाहीत. तरीही आम्ही परीक्षण करुन निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. उपनगरीय रेल्वे प्रवासी संस्थेच्या सदस्यांनीही सायंकाळी पाच नंतर गोयल यांची भेट घेऊन वातानुकूलित लोकल चालवण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र सामान्य फेऱ्या रद्द करुन वातानुकूलित लोकल चालवल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या फेऱ्यांचा विचार करावा आणि पास दर कमी करुन प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी केली.