मध्य रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १० महिन्यांमध्ये तब्बल १८ लाख ८ हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १०० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तिकीट काढून रेल्वेतून प्रवास करावा, असे आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : फेब्रुवारीत ९५८२ घरांची विक्री; घरविक्रीतून विक्रमी महसूल

मध्य रेल्वेवर विनातिकीट आणि अनियमित प्रवासांना आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल – एक्सप्रेसमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १८ लाख आठ हजार प्रवासी तिकीट न काढताच रेल्वेमधून प्रवास करताना आढळले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईकरून १०० कोटी रुपये वसूल करण्यात आले. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २५ हजार ७८१ प्रवाशांकडून ८७ लाख ४३ हजार रुपये, तर प्रथम श्रेणी डब्यांमधील एक लाख ४५ हजार प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईतून पाच कोटी पाच लाख रुपये वसूल करण्यात आले. यापूर्वी २०१९-२० या आर्थिक वर्षात मुंबई विभागातील सर्वाधिक दंडवसुली करण्यात आली होती. त्यावेळी १५ लाख ७३ हजार प्रकरणी कारवाई करून दंडरुपात ७६ कोटी ८२ लाख रुपये वसूल करण्यात आले होते.

हेही वाचा >>> कांद्याच्या दरावरून विधान परिषदेत गदारोळ, विरोधीपक्षाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर कामकाज तहकूब

तिकीट तपासनीस एस. नैनानी यांनी एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १७ हजार १२८ प्रकरणांमधून १.५० कोटी रुपये दंड वसूल केला. तिकीट तपासनीस भीम रेड्डी यांनी १० हजार ४०९ प्रकरणांमधून ९६ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल केला. यापाठोपाठ विशेष तेजस्विनी पथकातील तिकीट तपासनीस सुधा डी. यांनी सहा हजार १८२ प्रकरणांमधून २० लाख १५ हजार रुपये तर, तिकीट तपासनीस नम्रता एस. यांनी चार हजार २९३ प्रकरणांमधून १९ लाख ८८ हजार रुपये दंड वसूल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway collects rs 100 crore fine from ticketless travellers mumbai print news zws
First published on: 28-02-2023 at 19:33 IST