मुंबई : प्रवासी, पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात निवांतपणे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी सीएसएमटी आणि नागपूर स्थानकांच्या हद्दीत ‘चाकावरचे उपहारगृह’ (रेस्टाॅरन्ट ऑन व्हील) सुरू करण्यात आले असून प्रवासी, पर्यटकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरानमध्येही आकर्षक असे ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेची पाहणी आणि अन्य कामे प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> म्हाडातील बदल्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर?

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. या ठिकाणी आरामात बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल असे उपहारगृह नसल्याने प्रवासी, पर्यटकांना रेल्वे स्थानकाबाहेरील हॉटेलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतीय रेल्वेने ‘चाकावरचे उपहारगृह’ ही संकल्पना अंमलात आणली. रेल्वेच्या एका जुन्या वापरात नसलेल्या एक्स्प्रेस डब्याचे रूपांतर या उपहारगृहात करण्यात आले. या संकल्पनेतील पहिले ‘चाकावरील उपहारगृह’ ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएसएमटी स्थानकात उभारण्यात आले. या स्थानकावरील फलाट क्रमांक १८ च्या बाहेरील आवारातच (पी. डीमेलो रोड) हे उपहारगृह उभे करण्यात आले. उपहारगृहाचा डबा वातानुकूलित असून त्यात ४० जणांसाठी आसन व्यवस्था आहे. सीएसएमटी पाठोपाठ नागपूर स्थानकातही ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू करण्यात आले. या उपहारगृहांना चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सीएसएमटीमधील या उपहारगृहात सव्वालाख, तर नागपूरमधील उपहारगृहात दीड लाख व्यक्तींनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे.

हेही वाचा >>> अंगडिया खंडणी प्रकरण : निलंबित उपायुक्त त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन पुन्हा फेटाळला

तसेच चिंचवड, आकुर्डी, मिरज आणि बारामती येथे ‘चाकावरील उपहारगृह’ सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच याबाबतच्या अन्य कामांना सुरूवात करण्यात आल्याचे मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. ‘चाकावरच्या उपहारगृहा’साठी दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी स्थानकांच्या हद्दीत जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘चाकावरच्या उपहारगृहा’साठी पर्यटस्थळ असलेल्या माथेरानची निवड करण्यात आल्याचे सुतार यांनी सांगितले.

माथेरानमध्ये मोठया संख्येने येणारे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेतात. ‘चाकावरचे उपहारगृह’ उपलब्ध झाल्यास त्यालाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. माथेरानमध्ये या उपहारगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून विविध कामांसाठी बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन २२ ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे.