मुंबई : कांजूरमार्ग पाईप लाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कुठे – अप आणि डाऊन, धीम्या आणि जलद मार्ग, पाचवी आणि सहावी लाईन्स
कधी – शुक्रवार आणि शनिवारी रात्री १.१५ ते ३.१५ या कालावधीत
परिणाम – या ब्लॉक कालावधीत कांजूरमार्ग पाईप लाईन पुलावरील तुळई सुमारे ३५० टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या सहाय्याने उतरविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री १२ वाजून २४ मिनिटांनी सुटणारी गाडी आणि ठाण्याहून पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी सुटणारी गाडी रद्द करण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मुंबईकरांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करून प्रवास टाळावा किंवा अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.