मुंबई : नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी मिनी ट्रेन अर्थात ‘माथेरानची राणी’ बुधवार, ६ नोव्हेंबरपासून पुन्हा धावू लागेल. ‘नॅरो गेज’ मार्गिकेवरील ही रेल्वेसेवा दर पावसाळ्यात बंद ठेवण्यात येते. मुंबई आणि पुणेकरांसाठी माथेरान हे सर्वाधिक पसंतीचे थंड हवेचे ठिकाण आहे. एका दिवस सहलीचे नियोजनावर पर्यटक भर देतात. त्यातील ‘माथेरानच्या राणी’चे सर्वाधिक आकर्षण आहे.

पावसाळ्यात मिनी ट्रेनची सेवा बंद असली तरी या माथेरानच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. यंदाच्या वर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित सेवा बंद करण्यात आली. मध्यंतरी हा कालावधी ५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला. या काळात प्रवासी आणि पर्यटकांसाठी माथेरान ते अमन लॉजदरम्यान ‘शटल’ सेवा सुरू होती. थंडीच्या काळात माथेरान परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याने मिनी ट्रेन सेवा हे आकर्षणाचे केंद्र ठरते.

हे ही वाचा… बिष्णोई टोळीच्या नावाने आता फॅशन डिझायनरला दूरध्वनी, ५५ लाख रुपयांची मागणी

माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दररोज)

माथेरान येथून रोज सकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २, दुपारी ३.१५, सायंकाळी ५.२० वाजता ही गाडी सुटेल. ही गाडी अमन लॉज अनुक्रमे सकाळी ८.३८, सकाळी ९.२८, सकाळी ११.५३, दुपारी २.१८, दुपारी ३.३३, सायंकाळी ५.३८ वाजता पोहोचेल.

अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दररोज)

अमन लॉज येथून रोज सकाळी ८.४५, सकाळी ९.४५, दुपारी १२, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी ९.०३, सकाळी ९.५३, दुपारी १२.१८, दुपारी २.४३, दुपारी ३.५८, सायंकाळी ६.०३ वाजता पोहोचेल.

शनिवारी-रविवारी विशेष गाडी माथेरान सकाळी १०.०५, दुपारी १.१० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे सकाळी १०.२३ दुपारी १.२८ वाजता पोहोचेल. तसेच अमन लॉज येथून विशेष गाडी सकाळी १०.३०, दुपारी १.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी १०.४८, दुपारी १.५३ वाजता पोहोचेल.

हे ही वाचा… प्रमुख पक्षांकडून ‘वरळी’कर उमेदवारच नाही

नेरळ माथेरान फेऱ्या

● दररोज सकाळी ८.५० वाजता मिनी ट्रेन नेरळवरून सुटून माथेरान येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.

● दररोज सकाळी १०.२५ वाजता मिनी ट्रेन नेरळवरून सुटून माथेरान येथे दुपारी १.०५ वाजता पोहोचेल.

माथेरान नेरळ फेऱ्या

● दररोज दुपारी २.४५ वाजता माथेरानवरून मिनी ट्रेन सुटून नेरळ येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.

● दररोज दुपारी ४ वाजता माथेरानवरून मिनी ट्रेन सुटून नेरळ येथे सायंकाळी ६.४० वाजता पोहोचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या वर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित सेवा बंद करण्यात आली. मध्यंतरी हा कालावधी ५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला.