मध्य रेल्वेच्या मुलूंड स्थानकाजवळ रूळाला तडा गेल्याने शनिवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेले काही दिवस मध्य रेल्वेची वाहतूक वारंवार विस्कळीत होताना दिसत आहे. या रूळाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल ट्रेन २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत.