माटुंगा स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने मध्य रेल्वेची फास्ट ट्रॅकवरील वाहतूक शुक्रवारी दुपारी विस्कळीत झाली होती. स्थानकावजवळ असलेले झाड तुटून ते ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. झाड हटविण्यासाठी तातडीने मध्य रेल्वेच्या कर्मचाऱयांनी प्रयत्न सुरू केले.  झाड पडल्यामुळे फास्ट ट्रॅक मार्गावरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळविण्यात आली होती. झाड हटविल्यानंतर संध्याकाळी या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.