मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू असून या उत्सवासाठी गणेशभक्तांना कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. यासंदर्भात वैष्णव यांनी फडणवीस यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.
मुंबईत राहणारे कोकणवासी गणेशभक्त गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मूळगावी कोकणात जातात. तसेच राज्याच्या अन्य भागातील नागरिकही या सणासाठी प्रवास करतात. या सगळ्यांची या जादाच्या फेऱ्यांमुळे सोय होणार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.