मुंबई : सांताक्रुझ पूर्व येथील सात हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाइन पद्धतीने बुधवारी मंत्रालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध असे संगीत महाविद्यालय असावे, या उद्देशाने राज्य शासनाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय स्थापन करण्यास मान्यता दिली होती. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रातील पारंपरिक गोष्टींसह नवनवीन गोष्टी शिकता येणार आहेत.

हेही वाचा…महालक्ष्मी रेसकोर्सचे भवितव्य कंत्राटदारांना ठरवू देऊ नका, मकरंद नार्वेकर यांची मागणी

विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहनही मिळेल. या संगीत महाविद्यालयाच्या ऑनलाइन भूमीपूजन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, क्रीश्ना मंगेशकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा…भाजपकडून लोकसभेसाठी पाच महिलांना उमेदवारी, पूनम महाजन यांच्यावर टांगती तलवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४०० आसनव्यवस्थेचे प्रशस्त सभागृह, १८ वर्गखोली, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन

सांताक्रुझ पूर्व येथील उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात ४०० आसन क्षमता असलेले प्रशस्त सभागृह, १८ वर्गखोली, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन, २०० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ३०० आसन क्षमतेचे खुले सभागृह, शिक्षकांसाठी निवासाची व्यवस्था आदी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.