मुंबई : आयुष्याच्या प्रवासात दरवेळेला तुमच्याकडे उत्तम गोष्टी नसतात. परंतु ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्या गोष्टींचा उत्तम वापर कसा करू शकतो हे मी बाबांकडे पाहून शिकलो. एकाग्रतेच्या ताकदीची शिकवण ही बाबांकडून मिळालेली आहे, असे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी सांगितले.

प्रसिद्ध कवी दिवंगत रमेश तेंडुलकर हे १९७९ ते १९८९ या कालावधीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाचे संचालक होते. रमेश तेंडुलकर यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी मराठी संशोधन पत्रिकेच्या विशेषांकाचे सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुंबईतील नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात डिंपल प्रकाशनातर्फे ‘रमेश तेंडुलकर यांच्या सहवासातील साहित्यिक’ या पुस्तकाची नवी आवृत्ती, तसेच नितीन तेंडुलकर यांच्या ‘उडता उडता’ आणि ‘अधिक उंच उडता उडता’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा : अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड: लैलाच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

यावेळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, मराठी संशोधन मंडळाचे माजी संचालक डॉ. प्रदीप कर्णिक आदी उपस्थित होते.

हेही वाचा : राज्यातील सहा प्रकल्पांसाठी ६७ हजार कोटींच्या निविदा, निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय

क्रिकेटच्या सरावासाठी वानखेडे स्टेडियमला गाडीने जायचो, तेव्हा वाटेत बाबांना कीर्ती महाविद्यालयाजवळ सोडायचो. या दरम्यान गाडीत गाणी लावून गाडी चालवायला मला आवडायची. तेव्हा गाडीत बाबा पुस्तक वाचत बसायचे, अशी आठवण सचिन यांनी यावेळी सांगितली.