मुंबई : काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षातील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. पक्षाच्या सर्व आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. गुरुवारी १५ फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून, सर्व आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

गांधी भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्या उपस्थिती मंगळवारी प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यामुळे काय परिणाम होईल, आणखी कुणी पक्ष सोडेल का, याची चाचपणी करण्यात आली. चव्हाण यांचे काही समर्थक आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चेन्निथल्ला यांनी चव्हाण यांच्याबरोबर पक्षातील इतर कोणीही जाणार नाहीत, असा दावा केला.

हेही वाचा >>> रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या रिंगणात; किरण सामंतांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर काही नेते पक्षाच्या आमदारांशी संपर्क करीत असल्याचे समजते. गुरुवारी १५ फेब्रुवाराला विधिमंडळ आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली. २७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) व शिवसेना ( ठाकरे) गट यांच्या सहकार्याने ही निवडणूक लढविण्याची काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. बैठकीच्या निमित्ताने कोण कुठे आहे, याचीही चाचपणी केली जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत बैठकीत रणनीती ठरविली जाणार आहे.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसच्या वतीने १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळा येथे दोन दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला रमेश चेन्निथला यांचा हल्लाबोल

मुंबई : काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, अशी विविध पदे दिली. परंतु अचानकपणे ते भाजपमध्ये गेले. चव्हाण डरपोक असून मैदान सोडून पळाले. इतकेच नव्हे तर, विरोधकांशी हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली. चेन्निथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यामुळेकाय पारिणाम होईल, याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी दिल्लीत येऊन पक्षाध्यक्ष मलिकार्जून खरगे व इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. परवा मुंबईतील पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी ईडी, सीबीआयाला घाबरून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला का, याची उत्तरे त्यांना जनतेला द्यावी लागतील, असे चेन्निथला म्हणाले.

काँग्रेस नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा

मुंबई : राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी भेट घेतली.काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पवारांशी चर्चा केली. सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) चौकशीचा ससेमिरा मागे लावून नेत्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. े अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पाश्र्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या मागे भक्कम उभा असल्याची ग्वाही पवार यांनी दिल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा

मुंबई : राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी भेट घेतली.काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पवारांशी चर्चा केली. सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) चौकशीचा ससेमिरा मागे लावून नेत्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. े अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या मागे भक्कम उभा असल्याची ग्वाही पवार यांनी दिल्याचे समजते.