मुंबई : करोनाकाळात मृतदेहासाठी पिशव्या खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका अधिकारी रमाकांत बिरादार यांना समन्स बजावले आहे. त्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह चौघांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता.

पेडणेकर यांच्यासह वेदान्त इनोटेक प्रा. लि, तत्कालीन अतिरिक्त पालिका आयुक्त, मध्यवर्ती खरेदी विभागाचे (सीपीडी) तत्कालीन उपायुक्त व अनोळखी सरकारी कर्मचारी यांच्याविरोधात भादंवि कलम ४०९, ४१८, ४२० व १२०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार ४९ लाख ६३ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पडवाले हे याप्रकरणातील तक्रारदार आहेत. मृतदेहासाठी पिशव्या, मुखपट्टी व इतर साहित्याच्या खरेदीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Government failure to take action against misleading companies Supreme Court verdict on Patanjali case
दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत सरकार अपयशी; पतंजली प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशोरे
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ

प्राथमिक चौकशीदरम्यान पोलिसांनी सीपीडी विभागातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी, पिशव्या पुरवणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी यांचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार ८ मार्च २०२० मध्ये एक हजार पिशव्यांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता. सर्व पाहणी केल्यानंतर १६ मार्च रोजी वेदान्त इनोटेक प्रा. लि. कंपनीला ६,७१९ रुपये प्रति पिशवीप्रमाणे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर पुन्हा ११ मे रोजी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी वेदान्तसह आणखी एका कंपनीला अंतिम करण्यात आले होते. पण त्यावेळी तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला भायखळा येथील बंगल्यावर बोलावून वेदान्त इनोटेकलाच कंत्राट देण्यास सांगितले, असे जबाबात स्पष्ट झाले आहे.

त्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठांनाही माहिती दिली होती. त्यानंतरही वैद्यकीय अधिकाऱ्याने दुसऱ्या कंपनीला २०० पिशव्या पुरवण्याचे कंत्राट देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार त्या कंपनीने अंधेरी संकुल येथे २०० पिशव्या पुरवल्या. पण कोणतेही कारण न देता त्या पिशव्या स्वीकारण्यात आल्या नाहीत. १६ मे २०२० ते ७ जून २०२३ या काळात वेदान्त इनोटेकने ६,७१९ रुपये प्रतिपिशवी दराने १२०० पिशव्या पुरवल्या असून त्याबाबत कंपनीला ८० लाख ६२ हजार ८०० रुपये देण्यात आले आहेत. त्या काळात दुसऱ्या कंपनीने महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांना दोन हजार ९२५ प्रतिपिशवी दराने १०० पिशव्या पुरवल्या, असे तक्रारीत म्हटले आहे.