मुंबई:  Corona center malpractices मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी सुजीत पाटकर (४६) यांचा ताबा घेतला. पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणाबाबत तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाटकर यांना गेल्या महिन्यात अटक केली होती. त्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या ताबा घेतला. 

करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणात ३१ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. हे कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीचे पाटकर भागीदार होते. या प्रकरणात त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले आणि पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गेल्या वर्षी आझाद मैदान पोलिसांकडे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनी व तिच्या भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ ला हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी राजीव ऊर्फ राजू नंदकुमार साळुंखे (४८) व सुनील ऊर्फ बाळा रामचंद्र कदम (५८) या दोन आरोपींना अटक केली होती. आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला कंत्राटाचे ३१ कोटी ८४ लाख रुपये दिले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. 

kirit somaiya sanjay raut
“हिसाब तो देना पडेगा”, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला
ED Attaches Assets, more than Rs 73 Crore, patra chawl fraud case, pravin raut assests, Links to Sanjay Raut, marathi news, mumbai news, ed attaches pravin raut assests, ed, sanjay raut patra chawl, pratra chawl sanjay raut
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश
BJP Retain Support uttam jankar, madha lok sabha seat, uttam jankar, dhairyasheel mohite patil, NCP sharad pawar group, devendra fadnavis, amit shah,
माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण
Gajanan Kirtikar criticizes Narendra Modi for guarding Parliament
संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा! शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला

 एनएससीआय वरळी व दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सव्‍‌र्हिस कंपनीला मिळाले होते. त्याबाबत कंपनीकडून महापालिकेला सादर केलेला हजेरीपट व कागदपत्रे बनावट असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. करोना केंद्रांवर कार्यरत वैद्यकीय कर्मचारी ५० ते ६० टक्के कार्यरत असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आकडा वाढवण्यात आला. हा सर्व प्रकार सुजीत पाटकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप आहे. कंपनीला कंत्राट मिळवून देण्यातही पाटकर यांची महत्त्वाची भूमिका होती. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनी स्थापन करताना पाटकर यांनी केवळ १२ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली होती. या गैरप्रकारातून मिळालेली मोठी रक्कम पाटकर यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते.