scorecardresearch

Premium

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला देवनार पोलिसांनी गुरूवारी अटक केली.

cricket coach arrested molesting minor girl mumbai
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकाला अटक (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: क्रिकेट प्रशिक्षणातून काढून टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या शाळेतील क्रिकेट प्रशिक्षकाला देवनार पोलिसांनी गुरूवारी अटक केली. त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदयांतर्गत (पोक्सो) देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

varad nerkar, Nashik Student,Suicide, IIT Delhi, Polymer Science and Technology, Students Protest, Campus,
दिल्ली आयआयटीत सर्वच विद्यार्थी तणावाखाली, वरद नेरकरच्या आत्महत्येनंतर ठिय्या
ranji trophy 2024 mumbai beat assam by innings and 80 runs
Ranji Trophy 2024 : मुंबईकडून आसामचा दोन दिवसांतच डावाने धुव्वा
three sisters cracked NEET exam is first attempt
श्रीनगरमधील तीन बहिणी पहिल्याच प्रयत्नात NEET परीक्षेत उत्तीर्ण; तिघींनी कशी केली तयारी, जाणून घ्या
indian artist gogi saroj pal
व्यक्तिवेध : गोगी सरोज पाल

मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला देवनार पोलिसांनी गुरूवारी अटक केली. आरोपीने २६ ऑगस्ट रोजी शाळेच्या मैदानाशेजारी असलेल्या खोलीत पीडित मुलीशी अश्लील चाळे केले. त्याला विरोध केला असता प्रशिक्षणातून काढून टाकण्याची धमकी दिली.

हेही वाचा… प्रशासकीय इमारतीत जाणाऱ्या तरूणाकडे चाकू, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर प्रथम रायगड पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण गुन्हा देवनार पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे पोलिसांनी तो देवनार पोलिसांकडे वर्ग केला. आरोपींनी इतर मुलींबाबतही असे प्रकार केले होते का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricket coach arrested for molesting a minor girl mumbai print news dvr

First published on: 01-09-2023 at 13:01 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×