मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांचे शतक पूर्ण झाले आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांनी सर्वत्र सभा घेतल्या आहेत.

राज्यातील लोकसभेच्या चार टप्प्यांतील मतदानात आतार्यंत फडणवीस यांच्या १०५ सभा झाल्या आहेत. १००वी सभा पुण्यात झाली. महायुतीच्या प्रचाराची सारी धुरा फडणवीस यांच्यावर आहे. भाजपबरोबरच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांनी राज्यभर दौरे केले. प्रत्येक मतदारसंघात दोन ते तीन सभा पार पडल्या आहेत.

हेही वाचा >>> भाजपला साधे बहुमत मिळणेही अवघड ; पृथ्वीराज चव्हाण यांचा अंदाज; राज्यात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यातील सभांच्या वेळी फडणवीस हे उपस्थित राहिले. सकाळी ९ वाजता प्रचाराला बाहेर पडायचे आणि रात्री १०.३० नंतर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे हा त्यांचा नित्यक्रम राहिला आहे. पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये फडणवीस यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतवचन…

देवेंद्र फडणवीस यांनी ‘संतवचन’ नावाने समाजमाध्यमावर मालिका सुरू केली. १५ एप्रिलपासून दररोज एक पोस्ट करतात. जगदगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांचे ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत त्यादृष्टीने मोदी सरकारमध्ये काय काम झाले आहे, याचा दाखला देत आहेत.