आज स्थायी समितीत प्रस्ताव
देवनार क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी दिलेले कंत्राट रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
देवनार क्षेपणभूमीवर जमा होणाऱ्या २ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर दर दिवशी प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्माण करण्यास कंत्राटदार अपयशी ठरला आहे. त्यामुळे कंत्राटदाराला शास्त्रोक्त पद्धतीने ही क्षेपणभूमी बंद करण्यासाठीचे दिलेले कंत्राट रद्द करण्यात येणार आहे.
देवनार क्षेपणभूमी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर २०९ मध्ये संबंधित कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. या क्षेपणभूमीवर दररोज २ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल, असा प्रकल्प उभारणे व क्षेपणभूमी बंद करण्याची कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र यावर कार्यवाही न झाल्याने हे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती.