नवी दिल्ली / मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या पश्चिम सीमेवर ताणव वाढला असून पाकिस्तानकडून हवाई हल्ले झालेच तर नागरिकांना स्वत:चा बचाव करता यावा यासाठी आज, बुधवारी देशव्यापी स्वसंरक्षण सराव (मॉक ड्रिल) केला जाणार आहे. यामध्ये राज्यातील मुंबई, उरण, तारापूर यांसह १६ महत्त्वाच्या शहरांचा वा ठिकाणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील १६ शहरांचा समावेश नागरी सुरक्षा जिल्ह्यांमध्ये करण्यात आला (पान ४ वर) (पान १ वरून) आहे. त्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर व उपनगर शिवाय, उरणमध्ये जेएनपीटी बंदर व तारापूरमध्ये अणुउर्जा प्रकल्प असल्याने या तिन्ही शहरांचा प्रथम श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या श्रेणीमध्ये ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धताव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत व पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे. तर, तिसऱ्या श्रेणीमध्ये औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही शहरे आहेत. बुधवारी होणाऱ्या या ड्रिलसाठी नागरी संरक्षण यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून घेणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

‘मॉक ड्रिल’ कसे असेल?

● हवाई हल्ल्याचा इशारा देणारा भोंगा वाजल्यावर नागरिकांना ताबडतोब सुरक्षित जागी आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या जातील.

● क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ला झाल्यास भूयारी मार्ग वा तळघरांसारख्या मजबूत संरचनाची चाचपणी केली जाईल.

● नागरिकांचे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याची रंगीत तालीम घेतली जाईल.

● एनडीआरएफ व एसडीआरएफचे स्वयंसेवक नागरिकांना प्रतिकूल परिस्थितीत काय करायचे याचे प्रशिक्षण देतील.

● पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, रुग्णालये आणि नागरिक यांच्यातील समन्वयावर लक्ष केंद्रित केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● सरावावेळी परवलीचा शब्द व विशिष्ट वेळेत बचावकार्य करण्याचे उद्दिष्ट दिले जाईल.