राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या मदतीत राज्य सरकारही ६ हजार रुपयांची भर घालून ही रक्कम देणार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज हवामान बदल, अवकाळी पाऊस, अवर्षण अशा असंख्या समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले, तरी त्याला हक्काच्या मदतीची गरज आहे. कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे. यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल.”

“‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आम्ही जाहीर करतो”

“अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषीसन्मान निधी योजनेत राज्य सरकारच्या अनुदानाची भर घालण्यात येईल. त्यानुसार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आम्ही जाहीर करत आहोत. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आणखी ६ हजार रुपयांची भर घालेल,” अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : Maharashtra Budget 2023-2024 Live: नैसर्गित आपत्तीनंतर आता मोबईलवर ई-पंचनामे होणार, उपग्रह-ड्रोनची मदत घेतली जाणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील”

“त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे. त्यासाठी २०२३-२४ साठी ६ हजार ९०० कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केली जाईल,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.