वेदान्त-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस यासारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रापेक्षा गुजरातवर जास्त प्रेम असल्यानेच हे उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. लोकसत्ताच्या ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – MVA Mahamorcha: “महाविकास आघाडीच्या मोर्चापेक्षा आमच्या…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोचक टीका

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“पंतप्रधान मोदी राज्यांमध्ये स्पर्धा असताना भेदभाव करत नाही. पंतप्रधान मोदींचं केवळ गुजरातवर प्रेम असतं, तर २०१५ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र उद्योगात नंबर एकवर राहिला नसता. यादरम्यान, गुजरातला मागे टाकून आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो”, असं थेट उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

“मुळात जे उद्योग बाहेर गेले त्यांना अडीच वर्षात वाईट वागणूक मिळाली. याबाबत ते जाहीरपणे बोलणार नाहीत. मात्र, तुम्ही त्यांना कधी खासगीत विचारलं तर ते याबाबत तुम्हाला सविस्तर सांगतील, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच पुढच्या दोन वर्षात आम्ही गुजरातला मागे टाकून पुढे जाऊ”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – VIDEO: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, चेहऱ्याला लावलं ‘प्लॅस्टिक कवच’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. “राज्याचे गृहमंत्री जेलमध्ये जातात, उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जातो. कोणालाही उचलून जेलमध्ये टाकलं जातं, रोज खडंणी वसूली होते, अशा प्रकारे जर राज्यात वातावरण असेल तर गुंतवणूक कशी येईल”, अशी टीकाही त्यांनी केली. “पूर्वी औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धेत केवळ महाराष्ट्र पुढा होता. मात्र, आता प्रत्येक राज्य शर्यतीत आहे. त्यामुळे आपल्याला केवळ चांगलंच वागावं लागेल. आज छोटी राज्य हवी तसे निर्णय एका दिवसांत घेऊ शकतात. मात्र, मोठ्या राज्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे आपण या शर्यतीत धावणारे आहोत, हे समजून आपल्याला धावावे लागेल”, असेही ते म्हणाले.