मुंबई : सध्या राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून राजकीय पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आलेल्या दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना तब्बल २६ हजार रुपये बोनस बुधवारी जाहीर करण्यात आला. यामुळे प्रशासनाला मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतील २६० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

हेही वाचा >>> प्रदुषणामुळे श्वसनाचा विकार होणाऱ्या रुग्णांसाठी जे. जे. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून महानगरपालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे बोनसच्या घोषणेकडे लक्ष लागले होते. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली असतानाही बोनसची घोषणा करण्यात न आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. गेल्या वर्षी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संघटेनांच्या कृती समितीने ३० हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी केली होती. यासंदर्भात ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींनी वरील मागणीचा पुनरुच्चार केला होता. प्रशासन २५ हजार रुपये बोनस देण्यावर ठाम होते. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितीत ८ सप्टेंबर रोजर्सायंकाळी ७ वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महानगरपालिका अधिकारी, कामगार नेते उपस्थित होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर बुधवारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये बोनस देण्यावर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महानगरपालिकेतील एक लाख पाच हजार, तर बेस्ट उपक्रमातील ४० हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा >>> दुकानदारांना धमकावणाऱ्या तोतया महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई महानगरपालिकेच्या मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही २६ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसच्या ५० टक्के बोनस २०२१ पर्यंत मान्यताप्राप्त प्रथमिक शाळेतील शिक्षकांना देण्यात येत होता. मात्र यंदा त्यांनाही २६ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार, तसेच घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांना यंदा दिवाळीनिमित्त ११ हजार रुपये भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणार आहेत. आरोग्य स्वयंसेविकांना २०२२ मध्ये ९ हजार रुपये बोनस देण्यात आला होता.