मुंबई: महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जमीन बळकावण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केल्यानंतर आता भाजपचे माजी नगरसेवक आणि विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनीही या वादात उडी घेतली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये असा इशारा देतानाच रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने पारदशर्कता ठेवावी अशीही मागणी केली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सचा विषय गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात समाज माध्यमांवर केला होतो. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकावत असल्याचाही आरोप ठाकरे यांनी केला होता. या २२६ एकर खुल्या जागेच्या पुनर्विकासासंदर्भात एक गुप्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ६ डिसेंबरला पार पडली होती असाही आरोप ठाकरे यांनी केला होता. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) म्हणजेच रेसकोर्स व्यवस्थापनाचे चार प्रतिनिधी हजर होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर केला आहे. त्यानंतर आता या वादात भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

हेही वाचा… किमान तापमानात पुन्हा वाढ

राज्य सरकार आणि बीएमसीने रेसकोर्सच्या जमिनीच्या पुनर्विकासात पारदर्शकता ठेवली पाहिजे, या मुद्द्याचे कोणीही राजकारण करू नये, असे मत मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच या प्रस्तावित योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी या विषयावर उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणीही नार्वेकर यांनी केली.

सरकारने काही योजना आणली असेल त्याचे स्वागत आहे. मात्र वर्षा बंगल्यावरील बैठकीचे इतिवृत्त सार्वजनिक केले जावे, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे. तसेच रेसकोर्सच्या जमिनीचा वापर करण्याबाबतची प्रस्तावित योजना राज्य सरकार आणि पालिकेने सार्वजनिक करावी. जर पालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल हे रेसकोर्स व्यवस्थापनाला पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करणार असतील तर त्यांनी समाज माध्यमांद्वारे लोकांसमोरही सादरीकरण करावे. ती जागा कशासाठी वापरला जाईल हे नागरिक आणि रहिवासी संघटना यांनाही कळले पाहिजे. प्रस्तावित योजनेबद्दल नागरिकांना विश्वासात घेवून त्यावर त्यांच्या सूचना हरकती घ्याव्यात, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.

नाव न घेता टीका

रेसकोर्सच्या मुद्द्यावरून सध्या सुरु असलेल्या वादाबद्दल नार्वेकर यांनी कोणाचेही नाव न घेता टीका केली आहे. हा स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे असे ते म्हणले. काही राजकारणी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रसिद्धीसाठी राज्य सरकारला आव्हान देत आहेत. त्याच राजकारण्यांनी ते सरकारमध्ये असताना रेसकोर्सवर थीम पार्कची मागणी केली होती. त्यामुळे या योजनेबद्दल कोणतेही गैरसमज राहू नयेत याकरीता एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.