डॉ. सखाराम अर्जुन राऊतांची सावत्र मुलगी होती रखमाबाई. त्यावेळी म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी मुलगी झाली की लग्न व्हायची. मग वयात आल्यावर पतीच्या घरी पाठवलं जायचं. रखमाबाईंचं असंच लग्न केलं. ती अठरा वर्षांची झाल्यावर पती म्हणतो आता तुला माझ्या घरी यावंच लागेल. परंतु ती नकार देते. पती कोर्टात जाऊन तिला घरी नेण्याचा आदेश मिळवतो. परंतु रखमाबाई इंग्लंडच्या राणीकडे दाद मागते आणि राणी व्हिक्टोरिया तिचा विवाह रद्द करण्याचा आदेश देते. ही मुलगी नंतर इंग्लंडला जाते डॉक्टर होते व मुंबई प्रांतातली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करणारी पहिली महिला डॉक्टर होते. गावदेवीतल्या रखमाबाईंची ही स्फुर्तीदायक गोष्ट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr rakhmabai kyc story of mumbai
First published on: 13-03-2020 at 13:00 IST