मुंबईः अमली पदार्थ तस्कर अली असगर शिराझी व त्याच्या साथीदारांशी संबंधित पाच कोटी ३७ लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली. त्यात सात स्थावर मालमत्तांचा समावेश असून त्यांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे. या मालमत्ता सदनिका, दुकान व जमीन या स्वरूपात असून अली असगर शिराझी, मेहरीन शिराझी, अब्दुल समद, मनोज पटेल आणि भावेश शाह यांच्या नावावर आहेत. याशिवाय रामलखन पटेल, शोभा पटेल आणि मेसर्स हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट यांच्या नावावर बँकेत ३६ लाख ८१ हजार रुपयांच्या मुदत ठेवी असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुंबईतील जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. त्याच प्रकरणाच्या आधारवर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. अली असगर शिराझी आणि साथीदार ड्रग सिंडिकेट चालवत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. कॉल सेंटर्स / वेबसाइट्स चालवणाऱ्या दूरसंचार कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या, सल्लागार कंपन्या आणि बनावट औषध कंपन्या यांच्या माध्यमातून अमली पदार्थ परदेशात पाठवण्यात येत होते. बेकायदेशीर शिपिंग आणि इतर कंपन्यांमार्फत विक्रीची रक्कम चलनात आणण्यात येत होती. भारतातील कॉल सेंटर्समार्फत अमेरिका आणि यूकेमधून अमली पदार्थांची मागणी कळवण्यात येत होती. त्यानंतर बनावट औषध कंपन्या अमली पदार्थ खरेदी करीत होत्या. लॉजिस्टिक कंपन्यांद्वारे ते भारताबाहेर नेण्यात येत होते. अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम चलनात आणण्यासाठी लॉजिस्टिक आणि कन्सल्टन्सी कंपन्यांचे नेटवर्क वापरले जायचे. या टोळीशी संबंधित विविध कंपन्या अमेरिकेत पेमेंट गेट वे चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा वापर करून ही रक्कम भारतात आणण्यात येत होती.

ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
Thane rural police arrested 12 including chandrakant gaware in connection with 5 40 crores robbery
बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याच्या टोळीकडून लूट; ५.४० कोटींच्या लूटप्रकरणी १२ जणांना अटक 

हेही वाचा – मुंबई : काँग्रेसच्या आणखी तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश, सुषमा विनोद शेखर यांची काँग्रेसला सोडचिट्ठी

हेही वाचा – महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरण : छाप्यांमध्ये ५८० कोटींची मालमत्ता गोठवली

आरोपी अली असगर शिराझी आणि संबंधित व्यक्ती तसेच संस्था यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख ठेवी आहेत. अमली पदार्थ विक्रीतून कमवलेल्या ४४ कोटी ५० लाख रुपयांची माहिती ईडीला मिळाली आहे. यापूर्वी, ईडीने याप्रकरणी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. त्यात सुमारे दोन कोटी ९० लाख रुपये बँक खात्यातील ठेवी, मुदत ठेवी व सोने जप्त अथवा गोठवण्यात आले आहे. याप्रकरणी ईडीने ५ जानेवारी रोजी शिराझीला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.