लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने आता ई – ऑटो रिक्षाचा पर्याय पुढे आणला आहे. आकाराने लहान असलेल्या या ई – रिक्षामुळे चिंचोळ्या गल्ल्या व गल्लीबोळातील कचरा संकलन करणे सोपे होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. प्रायोगित तत्त्वावर सध्या गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प परिसरात अशा तीन रिक्षांचा वापर सुरू करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Dog Shot By Police Officer Over 30 Times
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

एका बाजूला पालिकेने मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेतलेली असली तरी अनेक ठिकाणी झोपडपट्टीत कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात. घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी पालिकेकडे झोपडपट्टीत पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हा कचरा इतरत्र फेकला जातो. त्यामुळे घनकचरा विभागाने घरगुती कचरा संकलनावर भर देण्यासाठी झोपडपट्टीबहुल भागात ‘ई ऑटो रिक्षा’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. अतिशय दाटीवाटीच्या आणि घनदाट लोकसंख्येच्या एम पूर्व विभागात पहिल्यांदा ई – ऑटो रिक्षाचा वापर सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिले होते.

आणखी वाचा-महारेरा अध्यक्षांसह सर्वांनाच आतापर्यंत दुहेरी आर्थिक लाभ, यापुढे पेन्शन वगळून वेतन

एम पूर्व विभागात गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प या भागात ई – ऑटो रिक्षाचा वापर पथदर्शी प्रकल्पअंतर्गत करण्यात येत आहे. झोपडपट्टी तसेच दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या या भागात मोठ्या जीपसारखी वाहने नेण्यासाठी, तसेच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच गल्लीबोळात पोहचण्यासाठी आकाराने छोट्या ई – ऑटो रिक्षांचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तीन ई – ऑटो रिक्षांचा वापर सध्या एम पूर्व विभागात करण्यात येत आहे. या पथदर्शी प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या काळात या भागात अशा स्वरूपाची वाहनांचा वापर करण्यात येईल, अशी माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांनी दिली. लवकरच डी विभागात देखील ई – ऑटो रिक्षाचा वापर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

ई – ऑटो रिक्षामुळे नागरिकांना कचरा टाकणे सोयीचे ठरत आहे. घरोघरी कचरा संकलनासाठी अवलंबण्यात आलेल्या धोरणानुसार झोपडपट्टीबहुल परिसरात कचरा संकलनाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट घनकचरा विभागाने ठेवले आहे. त्यानुसार आणखी तीन ई ऑटो रिक्षा या भागासाठी खरेदी करण्यात येणार आहेत. या वाहनांमुळे कोणताही आवाज होत नाही. पारंपरिक इंजिनपेक्षा या वाहनांच्या देखभाल आणि दुरूस्तीचा खर्च तुलनेत कमी आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.