कथित बॉडी बॅग घोटळ्याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( प्रकल्प ), माजी महापालिका उपायुक्त ( खरेदी/सीपीडी ), खासगी कंत्राटदार वेदान्ता इनोटेक आणि अनोळखी सरकारी अधिकाऱ्याविरोधात मनी लाँडरिंग अंतर्गत ( पीएमएलए ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कथित ४९.६३ लाखांच्या बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ४ ऑगस्टला पेडणेकरांसह, माजी अधिकारी आणि अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लवकर ईडीकडून पेडकरांसह इतरांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

हेही वाचा : दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरण : रश्मी शुक्ला यांच्यावरील दोन गुन्हे रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय

बॉडी बॅग घोटळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं मागील महिन्यात महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना अटक केली होती. बिरादार करोना काळात खरेदी विभागाचे प्रमुख होते. यापूर्वीच ईडीनं करोनाकाळातील कथित अनियमितेबद्दल बिरादार यांचा जबाब नोंदवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करोना काळात अनियमितता झाल्याप्रकरणी भाजपा नेते, किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. खाजगी कंपनीनं १५०० रूपयांची एक बॉडी बॅग महापालिकेला तिप्पट म्हणजे ६ हजार ७१९ रूपयांना पुरवली होती.