scorecardresearch

Premium

छगन आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर चौकशी

छगन भुजबळ यांनी अटकेपूर्वीच्या ११ तासांच्या चौकशीत काहीच सहकार्य केले नाही

ED , sameer bhujbal , Chhagan bhujbal , Maharashtra sadan, छगन भुजबळ, समीर भुजबळ, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
छगन भुजबळ

महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी गुरूवारी सकाळी समीर यांना अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात आणण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर आता समीर भुजबळ यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले आहे. तर छगन भुजबळ यांना थोड्याचवेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे.
छगन भुजबळ यांनी अटकेपूर्वीच्या ११ तासांच्या चौकशीत काहीच सहकार्य केले नव्हते. सर्व प्रश्नांना मला माहिती नाही, असे उत्तर दिल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता. याशिवाय, समीर भुजबळ यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही मला त्यांच्या व्यवहारांबद्दल कोणती माहिती नसल्याचे भुजबळांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाची परवानगी घेऊन आज त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
छगन भुजबळ यांच्या कोठडीची मुदत संपत असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी ईडी भुजबळ यांच्या अधिकच्या तपासासाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी काल छगन भुजबळांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर जेजे रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी ईडीच्या कार्यालयात त्यांची तपासणी केली. भुजबळांचा जुना ईसीजी आणि नुकताच काढलेल्या ईसीजीमध्ये बदल असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, आज भुजबळ यांना जे जे रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.

genelia deshmukh gets surrounded with little kids on the street
Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
cm eknatha shinde, shetkari samvad yatra eknath shinde, drought in maharashtra, reasons of shetkari samvad yatra
दुष्काळाच्या तोंडावर शिंदेसेना शेतकऱ्यांच्या बांधावर
Parineeti Chopra and Raghav Chadha
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात; ‘अशी’ आहे विधी आणि कार्यक्रमाची वेळ
Dnyanada supriya
‘ठिपक्यांची रांगोळी’तील अप्पूने सांभाळलं सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलचं कॅश काउंटर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed start probe of sameer bhujbal and chhagan bhujbal front to front

First published on: 17-03-2016 at 10:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×